पुण्यात २ कोटी १० लाखाचा गांजा आणि चरस जप्त ; चौघांना अटक

पुणे (वृत्तसंस्था) पुणे कस्टम विभागाने तब्बल 2 कोटी 10 लाखाचा गांजा आणि चरस जप्त करत चौघांना अटक केलीय. यावेळी तब्बल 868 किलो गांजा तर ७.५ चरस जप्त करण्यात आला आहे. आंध्रप्रदेश मधून महाराष्ट्रात हा गांजा वेगवेगळ्या ठिकाणी विकला जात होता.

 

गांजा तस्करीविरोधात ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत गांजासह 7.5 किलो चरस जप्त करण्यात आला आहे. 1 कोटी 4 लाख रुपयांचा गांजा आणि 75 लाख रुपयांचा चरस जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून तस्करांनी कंटेनर रिकामा दाखवून टपात गांजा आणि चरस लपवून वाहतूक केली जात होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नळदुर्ग सोलापूर रोडवर बोरामणी गावाजवळ कस्टमच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचत कारवाई केली.

Protected Content