Home आरोग्य गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १७,२९६ नवे रुग्ण आढळले

गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १७,२९६ नवे रुग्ण आढळले



नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १७,२९६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचार सुरु असलेल्या ४०७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

 

आजवरची एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ४,९०,४०१ इतकी झाली. तर १५ हजार ३०१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या १४ हजारांहून अधिक वाढण्याचा हा सलग सातवा दिवस होता. २० जून रोजी १४ हजार ५१६, २१ जून रोजी १५ हजार ४१३, २२ जून रोजी १४ हजार ८२१, २३ जून रोजी १४ हजार ९३३, तर २४ जून रोजी रुग्णांच्या संख्येत १५ हजार ९६८ रूग्णांची वाढ झाली. याचाच अर्थ, करोना संसर्गाच्या प्रकरणांत २० जूनपासून एक लाख रुग्णांची भर पडली असून, १ जूनपासून रुग्णसंख्या २.८२ लाखांहून अधिक वाढली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत ही आतापर्यंत झालेली सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.


Protected Content

Play sound