चुंचाळे येथे एकाने घेतला गळफास

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे गावात राहणाऱ्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, असलम सायबु तडवी (वय३०) असे मृत तरुणाचे नाव असून असलम याने आज (दि.१४) रोजी सकाळी १० ते १०:३० वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घरातील इतर सदस्य बसले असता तडवी यांचा सहा वर्षाचा आशु नावाचा मुलगा हा घरात आपल्या वडीलांना पाहण्यासाठी गेला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. असलम यांना तात्काळ खाली उतरवले असून उपचारासाठी जळगाव येथे घेवुन जात असतांना वाहन जळगाव शहरात पोहोचताच त्या तरूणास मृत्युने गाठले व त्यांची प्राणज्योत मावळली. मयत तरूण असलम तडवी हा मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करीत होता. त्यास दारूचे व्यसन असल्याचे वृत्त आहे. मयत तडवी याच्या मृतदेहावर जळगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!