जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेतर्फे खुला भूखंड कर बुधवार २४ जूनपासून स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. खुला भूखंड करधारक रोख किंवा धनादेशाद्वारे हा कर भरू शकणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र व राज्य सरकाने २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करून संचारबंदी लागू केली होती. या कालावधित खुला भूखंड कर भारण्यासासाठी होणारी गर्दी लक्षांत घेता महापालिकेतर्फे हा कर स्वीकारण्यात आलेला नाही. मात्र, बुधवार २४ जूनपासून खुला भूखंड कर रोख व धनादेशाद्वारे स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तरी खुला भूखंड करधारकांनी सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त संतोष वाहुळे यांनी केले आहे.