अखिल भारतीय सरपंच परिषदच्या तालुकाध्यक्षपदी सिंगतचे प्रमोद चौधरी

रावेर प्रतिनिधी । अखिल भारतीय सरपंच परिषदच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी सिंगत येथील प्रमोद चौधरी यांनी एकमताने निवड करण्यात आली आहे. 

रावेर येथील कृषी उपन्न बाजार समिती मध्ये महाराष्ट्र अखिल भारतीय सरपंच परिषदचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आज जळगाव जिल्हा सरपंच जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत महाजन  यांच्या उपस्थित प्रमोद चौधरी सिंगत यांची बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी माजी तालुकाध्यक्ष जगदीश पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या पदावर श्री चौधरी यांची निवड करण्यात आली. बैठकीला  खिरवळ सरपंच निळकंठ चौधरी, अटवाडा गणेश महाजन, के-हाळा सरपंच राहुल पाटील, भाटखेडा सरपंच कैलास पाटील, विटवे सरपंच भास्कर चौधरी, उटखेडा सरपंच सविता गाढे, लियाकत जमादार, स्वाती परदेशी, भावना बोरोले, राहुल पाटील, राहुल चौधरी, दिपाली कोळी, गजानन पाटील, धनराज कोळी, स्वाती वाघ, विनायक पाटील, लताबाई बोंडे, सलीम तडवी, महेंद्र पाटील आदी तालुका भरातील सरपंच बैठकीला उपस्थित होते. यावेळी सरपंच संघटनेच्या बैठकीत सरपंच यांना येणाऱ्या समस्या बाबत देखील चर्चा झाली

 

 

 

Protected Content