नागपुरात पार्किंगच्या वादातून महिलेची निर्घुण हत्या !

नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरात पार्किंगच्या वादातून एका महिलेची निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरती गिरडकर असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

 

नंदनवन गल्ली नंबर 5 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी एकनाथ टपरे आणि आरती गिरडकर यांच्यात पार्किंगचा वाद होता. त्याच वादातून आरोपीने त्यांच्या धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती समोर आली आहे. घराजवळील पार्किंगमुळे आरती आणि एकनाथ यांच्या मोठा वाद झाला. याचा रागातून एकनाथ यांनी आरतीची हत्या केली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Protected Content