Home आरोग्य तांदलवाडी येथील दाम्पत्य कोरोना पॉझिटीव्ह; परिसर सील

तांदलवाडी येथील दाम्पत्य कोरोना पॉझिटीव्ह; परिसर सील


सावदा प्रतिनिधी । सावदा कोवीड सेंटरने पाठविलेल्या स्वॅबचा अहवाल आज आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले असून त्यात तांदलवाडी येथील दाम्पत्य पॉझीटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवराज पाटील यांनी दिली.

सावदा कोवीड सेंटरने संशयित रूग्णांचे स्बॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. आज कोवीड सेंटरला तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यात रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील दाम्पत्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान पॉझिटीव्ह आलेल्या दोन्ही रूग्णांच्या संपर्कातील ग्रामस्थांची चौकशी सुरू आहे. संशयित म्हणून व्यक्ती आढळून आल्यास त्यांना त्वरीत क्वारंटाईन करण्यात येणार आहे. रूग्णांचा रहिवास असलेला परिसर निर्जंतूकीकरण करण्याचे काम आरोग्य पथकाकडून सुरू असून परिसर सील करण्याचे काम सुरू आहे. या वृत्ताला तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवराम पाटील यांनी दुजारो दिला आहे.


Protected Content

Play sound