Home आरोग्य फैजपुरातील तिघे कोरोनामुक्त; शेजारच्यांनी केले जल्लोषात स्वागत

फैजपुरातील तिघे कोरोनामुक्त; शेजारच्यांनी केले जल्लोषात स्वागत

0
35

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । शहरात आज एक कोरोना बाधीत आढळून आला असला तरी आधी उपचार घेणारे तीन रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांचे शेजार्‍यांनी अतिशय जल्लोषात स्वागत केले.

फैजपूरयेथील श्रीकृष्ण नगर मधील पालिकेच्या सेवानिवृत्त कोरोना बाधित कर्मचार्‍याच्या पत्नीचा अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता २६ झाली आहे, दरम्यान अतिशय समाधानाची बाब म्हणजे रथ गल्लीतील दोन महिला व एक लहान मुलगी असे तिघे कोरोना मुक्त होऊन घरी परतले असून त्यांचे रथ गल्लीतील रहिवाशांनी फटाके फोडत व फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले. येथील कोरोना रुग्णांची संख्या २६ झाली असली तरी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही आता ११ वर गेली आहे. आज खुशाल भाऊ रोडवरील बाधा झालेल्या व औरंगाबाद येथे उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर आजवर शहरातील तीन रूग्ण तीन मयत झाले असून सध्या बारा रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound