Home आरोग्य ‘रॅगिंग नको, मैत्री हवी!’ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांची जनजागृती

‘रॅगिंग नको, मैत्री हवी!’ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांची जनजागृती

0
10

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जनजागृती निर्माण करून सुरक्षित आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे १२ ते १८ ऑगस्टदरम्यान अ‍ॅन्टी रॅगिंग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रॅगिंगचे दुष्परिणाम आणि त्याविरोधात सजग राहण्याचा संदेश देण्यात आला.

या सप्ताहात कार्यशाळा, रॅगिंगविरोधी शॉर्ट फिल्म, जनजागृतीपर रॅली, पोस्टर प्रदर्शन, घोषवाक्य सादरीकरण तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत रॅगिंगविरोधी नियम, प्रतिबंधात्मक उपाय आणि रॅगिंगची घटना निदर्शनास आल्यास त्याबाबत तक्रार करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शैक्षणिक जीवनावर होणारे परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स व घोषवाक्यांमधूनही रॅगिंगविरोधी संदेश देण्यात आला. रॅगिंगमुक्त महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सप्ताहाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या जनजागृतीपर रॅलीत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. विजय बाविस्कर, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ. माया आर्विकर, सुरेंद्र गावंडे यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले.

रॅगिंगला प्रतिबंध करण्यासाठी सातत्यपूर्ण जनजागृती, परस्पर सन्मान आणि विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

 


Protected Content

Play sound