Home धर्म-समाज श्री रेवांनद स्वामींच्या पुण्यतीथी सोहळा मोजक्या भावीकांच्या उपस्थिती होणार साजरा

श्री रेवांनद स्वामींच्या पुण्यतीथी सोहळा मोजक्या भावीकांच्या उपस्थिती होणार साजरा

0
44

यावल, प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील बूऱ्हाणपुर जिल्हातील नेपानगर तालुक्यातील अंबाडा येथे दरवर्षी प्रमाणे जेष्ट कृ.९, निम्मत १४ जानेवारी २० रोज रविवारी श्री रेवांनद स्वामींच्या पुण्यतीथी सोहळ्यांचा कार्यक्रमाला या वर्षी कोरोना संसर्गाच्या या विषाणुजन्य आजारामुळे रद्द करण्यात आला असुन प्रशासनाकडुन परवानगी मिळाली नसल्याची माहीती दादाभत्त गण पन्नालाल पाटील यांनी दिली.

मध्य प्रदेशातील नेपानगर तालुक्यातील अंबाडा येथे श्री रेवांनद स्वामींच्या पुण्यतीथी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येतो. यासाठी जळगाव जिल्हाभरातील श्री धुनीवाले दादाजी भत्तगण श्री रेवांनद स्वामींच्या पुण्यतीथी सोहळा साजरा करण्यासाठी जात असतात. मात्र, कोरोना व्हायरस या विषाणुजन्य आजाराने सर्वत्र खबरदारी घेण्यात आली असून सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले असल्यामुळे मध्य प्रदेश राज्यातील बुरहाणपुर जिल्हा प्रशाषनाने या वर्षी श्री रेवांनद स्वामी पुण्यतीथी सोहळा साजरा करण्यासाठी पाच भत्तगणांना उपस्थितीमध्ये पुजाअर्चना करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. प्रसाद वाटप कार्यक्रमला हि स्थगीती दिली आहे तरी जळगाव जिल्हातील भावीकांनी कार्यक्रमाला जावु नये असे आवाहन मनवेल तालुका यावल येथील राहणारे पन्नालाल हुकूमचंद पाटील यांनी सर्व भाविकांना केले आहे.


Protected Content

Play sound