पेट्रोल-डिझेलवर वाढीव कर नको : बाळा नांदगावकर


मुंबई (वृत्तसंस्था)
सध्या कोरोना महामारीमुळे सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात घटला आहे. सरकार त्याची भरपाई ही वारंवार पेट्रोल आणि डिझेलवर कर वाढवून करत आहे, परंतु त्याऐवजी सरकारने सिगरेट आणि तंबाखूजन्य गोष्टींवर “कोरोना सेस” लावून ही महसुली तूट भरुन काढावी आणि पेट्रोल व डिझेलवर नवनवीन कर लादणे तात्काळ थांबवावे, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

 

आज पेट्रोलच्या दरात 63 पैसे, तर डिझेलच्या दरात 60 पैसे दरवाढ झाली. त्यामुळे पुण्यात पेट्रोलचा दर 81.93 रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचा दर 70.80 रुपये प्रतिलिटरवर गेला आहे. याआधीही बाळा नांदगावकर यांनी इंधन दरवाढीवरुन राज्य सरकारला सुनावले होते. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर 2 रुपये मूल्यवर्धित कर वाढविण्याऐवजी मद्यावरील कर वाढवावा अशी मागणी केली होती. मद्य हे नक्कीच जीवनावश्यक नव्हे परंतु इंधन हे जीवनावश्यक आहे. त्यामुळे सरकारने पेट्रोल व डिझेल दरवाढ मागे घ्यावी आणि मद्यावरील कर वाढवून महसुली तूट भरुन काढावी, असे नांदगावकर यांनी म्हटले आहे.

Protected Content