Home आरोग्य फैजपुरातील कोरोना बाधीत डॉक्टरच्या पत्नीचा रिपोर्टही पॉझिटीव्ह

फैजपुरातील कोरोना बाधीत डॉक्टरच्या पत्नीचा रिपोर्टही पॉझिटीव्ह

0
34

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । शहरातील एक डॉक्टरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली असून आता मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या रिपोर्टमध्ये त्यांच्या पत्नीलाही या विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

फैजपूर येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. यात मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील मिल्लतनगर भागातील रहिवासी असणारी एक महिला ही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले आहे. या महिलेचे पती डॉक्टर असून ते काही दिवसांपूर्वीच कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पाठोपाठ आता त्यांच्या पत्नीलाही याचा संसर्ग झाल्याचे दिसून आले असून प्रशासनाने याला दुजोरा दिला आहे.


Protected Content

Play sound