बाजारपेठ स्थानकातील कोरोनामुक्त पोलीस कर्मचार्‍याचे स्वागत

भुसावळ संतोष शेलोडे । येथे काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झालेला पोलीस कर्मचारी या विषाणूवर मात करून पुन्हा आपल्या कर्तव्यावर परतला. शनिवारी रात्री सहकारी कर्मचार्‍यांसह डीवायएसपी गजानन राठोड व पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांनी त्याचे स्वागत केले.

भुसावळ मधील बाजारपेठ पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने मालेगाव बंदोबस्तासाठी गेला असतांना त्याला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली होती. या पोलीस कर्मचार्‍याला उपचारासाठी नाशिक येते रवाना करण्यात आले होते. त्यादरम्यान कोरोनाशी यशस्वी मुकाबला करून हा पोलीस कर्मचारी योगेश महाजन बाजारपेठ पोलीस स्टेशनला परतल्याने पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांनी टाळ्यांच्या कडकडाट व पुष्पाचा वर्षाव करून स्वागत करून मनोबल वाढविले. भुसावळातील बाजारपेठच्या कोरोना बाधित पोलीस कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे.आपले मनोबल खचू न देता कुठलीही भीती न ठेवता कोरोनवर मात करता येऊ शकते हे पोलीस योद्धा कर्मचार्‍याने दाखवून दिले आहे. तर भुसावळचे उपविभागीय पोलीस कर्मचारी गजानन राठोड यांनी सुध्दा या कर्मचार्‍याचे कौतुक केले आहे.

कोरोनाला हरविणार्‍या पोलीस कर्मचार्‍याच्या स्वागताचा व्हिडीओ खाली उपलब्ध आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/257364808702540

Protected Content