दिलासा : फैजपूर पोलीस स्थानकातील कर्मचार्‍यांचे रिपोर्ट निगेटीव्ह

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । फैजपूर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांसह अन्य अशा १९ संशयितांचे कोरोना रिपोर्ट आज रात्री निगेटीव्ह आल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.

फैजपूर येथील पोलीस अधिकारी काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांचे स्वॅब सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज रात्री यातील सर्वच्या सर्व १९ अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहेत. यात पोलीस कर्मचार्‍यांसह काही नागरिकांचा समावेश होता. पोलीस कर्मचार्‍यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने पोलीस यंत्रणेवरील अनामिक दडपण दूर झाले आहे. पोलिस प्रशासनाने लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून अतिशय परिश्रमपूर्वक कर्तव्य पार पाडले आहे. आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने पोलीस याच तडफेने कर्तव्य पार पाडतील अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

Protected Content