मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिर

 

एरंडोल, प्रतिनिधी | येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आवाहनानुसार एरंडोल येथे शिवसेनातर्फे जिल्ह्यात पहिले रक्तदान शिबिर घेण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांचा व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा घेण्यात आलेल्या बैठकीत कोरोनाचा महामारीत आठच दिवस रक्तसाठा पुरेल एवढाच शिल्लक असून शिवसेना शाखे शाखे ने रक्त संकलन करणा-या संस्थाचा मदतीने रक्तदान शिबीरे ताबडतोब घ्यावेत अशा सूचना केल्या. त्यानुसार एरंडोल शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांच्या वाढदिवस या दोघं गोष्टीच अवचित्त साधुन रक्तदान शिबिर घेण्यात आले. या चाळीस युवासेनेच्या दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख जगदीश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, नगरसेवक कृणाल महाजन, शालिक गायकवाड, सुनिल चौधरी (भगत), सुनिल चौधरी (पत्रकार) आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पचांयत समितीचे उपसभापती अनिल महाजन, उपतालुका प्रमुख रविंद्र चौधरी, पंचायत समिती सदस्य विवेक पाटील यांनी शिबिराला भेट देवुन रक्तदात्याना पोषक असा आहार देवुन, दात्याचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला जळगाव येथिल गोळवलकर गुरुजी रक्तपेढी यांचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, यशस्वीतेसाठी घनश्याम पाटील, कमलेश पाटील, कृणाल पाटील, देवेंद्र पाटील विखरण यांनी कामकाज पहिले. यावेळी शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन भैय्या महाजन यांनी तर आभार युवासेना तालुका प्रमुख बबलु पाटील यांनी मानले.

Protected Content