नागपूर नवनियुक्त आयुक्तांचा कामाचा धडाका, कोव्हिड सेंटरला दिली अचानक भेट

नागपूर वृत्तसंस्था । नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी येथील पाचपावली कोवीड सेंटरला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कोवीड सेंटर कोरोना चाचणीची पाहणी करून आवश्यक त्या सुचना देण्यात आल्यात तर खासगी डॉक्टरांची बैठक घेण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी अचानक पाचपावली कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली. त्यानंतर पाचपावली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाचपावली सुतीकागृहाची त्यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते.

नागपूर शहरात कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे. हे लक्षात घेता चाचणीची संख्या आणि वेग वाढवणे आवश्यक आहे. या उद्देशाने मनपा आयुक्तांनी शहरातील कोव्हिड चाचणी केंद्रांची संख्या वाढविली. मात्र यासोबतच चाचणी करताना योग्य खबरदारी घेतली जाते की नाही, तसेच निर्धारित वेळेतच चाचणी केली जाते का, याबाबत आयुक्तांनी चौकशी केली.

Protected Content