क्वारंटाईन व्यक्तीच्या सॅम्पलबाबत दोन वेगवेगळे एसएमएस ; संभ्रमात वाढ

 

भुसावळ, प्रतिनिधी | येथील राम मंदिर वार्डातील ५ जणांना जवाहर नवोदय विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले असून कुठले ही सॅम्पल न घेता त्यांचे सॅम्पल प्राप्त झाल्याचे एस.एम.एस.रात्री मिळाल्याने संशयित व्यक्तीला संभ्रमात पडला असून मनात भीती निर्माण झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, राममंदिर वार्डातील बालाजी गल्लीतील संशयित व्यक्तीला जवाहर नवोदय विद्यालयात ४ ते ५ दिवसापासून क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. त्याच्या घरच्या मोबाईलवर शासनाच्या कोव्हिड -19 संदर्भातील अधिकृत वेब साईट वरून दिनांक १ मे एका बल्क एसएमएसव्दारे कळविण्यात आले की तुमचे सॅम्पल प्राप्त झाले आहे. आणि नंतर काही वेळेने पुन्हा नवीन मेसेज आला असून त्यात सॅम्पल घेतले नसल्याचे दर्शविलेले आहे. सदरील शासनाकडून आलेल्या या दोन मेसेजमुळे या संशयित व्यक्तींचे कुटुंब संभ्रमात पडलेले आहे. परंतु, याबाबत सत्यता अशी आहे की संशयित व्यक्तीचे कुठलेही सॅम्पल घेण्यात आलेले नसल्याचे या संशयित व्यक्तीने पत्रकारांना कळविलेले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटूंबात भीती निर्माण झाली असून वैद्यकीय प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे या संशयित व्यक्तीला व त्याच्या कुटूंबियांना धीर देण्याची व योग्य समुपदेशन करण्याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी जनमानसातून प्रतिक्रिया उमटत आहे.

Protected Content