समस्यांनी त्रस्त ; भुसावळच्या हुडको कॉलनीचा मतदानावर बहिष्कार

 

 

भुसावळ  : प्रतिनिधी । येथील हुडको कॉलनीतील रहिवाशांनी मूलभूत समस्यांच्या अभावाला वैतागून आता  आगामी निवडणुकांसाठीच्या मतदानावर बहिष्काराची भूमिका घेतली आहे

 

शहरातील हुडको कॉलनीची स्थापना म्हाडा अंतर्गत 27 वर्षांपूर्वी करण्यात आली होती, तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक समस्यांचा विळख्यात  हुडको कॉलनी सापडलेली आहे, समस्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी येणाऱ्या निवडणुकांवर  बहिष्कार घातलेला आहे

 

हुडको कॉलनीमध्ये सर्व सुशिक्षित लोक राहतात, याठिकाणी काही ओपन प्लॉट असल्यामुळे इतर भागातील कचरा काही नागरिक या ओपन प्लॉटमध्ये आणून टाकत आहेत, कॉलनीत सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे ,विद्युत खांब असूनही त्यावर लाईट नाही, रात्री अंधाराचे साम्राज्य असते सध्या पावसाळा सुरू आहे ,कॉलनी परिसरामध्ये एकही चांगला रस्ता नसल्यामुळे चिखलातून वाट काढत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे पिण्याच्या पाण्याचे  बेहालच आहेत पंधरा दिवसातून हुडको कॉलनीला एकवेळ पाणीपुरवठा केला जातो, तोही अस्वच्छ असतो नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे  भुसावळ नगरपालिकेत वारंवार तक्रारी देऊनही नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे  हुडको कॉलनी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन कॉलनीतील समस्यांचा पाढा वाचला आमच्या समस्या सुटत  नाहीत, तोपर्यंत आगामी निवडणुकांमध्ये आम्ही मतदान करणार नाही  अशी भूमिका  स्थानिक रहिवाशांनी  घेतली  आहे.

 

Protected Content