घरफोडी , अवैध सावकारीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडला

 

भुसावळ : प्रतिनिधी । .घरफोडी , अवैध  सावकारीच्या गुन्ह्यातील आरोपी  इमरान शेख याला बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे

 

भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात .गुरन २२/ २०२१  भादवी कलम ३८० ,४४८, ४५१, ४५२, ४५७, ४५८, ५०४, ५०६,५०७, ५०९ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम चे कलम ३९ प्रमाणे १७ जानेवारी रोजी इमरान शेख विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला होता  तेव्हा पासुन इमरान शेख गुलाम रसुल ( वय- ३१ , रा. – १५ बंगला क्वाॅ.नं आर.बी.- १,  ९८० -सी भुसावळ) फरार होता

 

सहा.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन त्यास ९ फेब्रुवारी रोजी भुसावळ शहरातील तहसील कार्यालयाच्या परीसरतुन ताब्यात घेवुन  अटक करण्यात आली आहे.

ही  कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे ,  अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे , पोलीस निरीक्षक  दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस  निरीक्षक कृष्णा भोये , पो.ना.रमण सुरळकर, उमाकांत पाटील पो.काॅ. विकास सातदिवे, प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, अक्षय चव्हाण, कृष्णा देशमुख,  रविंद्र तायडे यांनी  केली पुढील तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये ,पो.काॅ.रविंद्र तायडे करीत आहेत.

Protected Content