जिल्ह्यातून रेल्वे सेवेस प्रारंभ ; सकाळपासून धावल्या तीन रेल्वे

 

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातून रेल्वे सेवा सोमवार १ जून पासून सुरु झाली असून सकाळी तीन रेल्वे जिल्ह्यातून धावल्यात. रेल्वे स्थानकावर सुरक्षेतेची सर्व दक्षता घेतली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

आरक्षित तिकीटधारकांनाच रेल्वे मधून प्रवास करता येत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार भुसावळ विभागातून १९ रेल्वे धावणार आहेत. मात्र, राज्य सरकारच्या सिमाबंदी आदेशामुळे जिल्ह्यातील प्रवाश्यांना रेल्वे प्रवास उपलब्ध नाही. सोमवारी सकाळी महानगरी, ताप्ती गंगा व छपरा एक्स्प्रेस धावल्या. दिवसभरात कामायनी व पवन एक्स्प्रेसचे देखील नियोजन असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे स्थानकावर परवानाधारक खाद्यपदार्थ व आवश्यक वस्तू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणत आहे. प्रवाश्यांना मास्क व शारिरीक अंतर ठेवणे बंधकारक आहे.

Protected Content