फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात राहणाऱ्या डॉक्टराचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. प्रशासनाने वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आले आहे.
फैजपूर येथील प्रशासनाच्या आदेशानुसार आज शहरातील कुरेशी मोहल्ला (सुभाष चौक ते मोठा मारुती रोडचा पूर्वेकडील भाग) येथील रहिवाशी व्यवसायाने डॉक्टर असलेला रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. कुरेशी मोहल्ला हा भाग प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या रुग्णाच्या घरापासून एक किमी परिघाचे क्षेत्रात प्राशासनाकडून सील करण्यात आले आहे. काल एक पोलीस अधिकारी कोरोना बाधित झाल्याने बस स्टँड मागील भाग नम्रता नगर हा भाग प्रशासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आला. नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. नाकातोंडावर मास्क बांधावे, घरी सुरक्षित रहावे, आपल्यासह कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.