चिनावल येथे तीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले

सावदा प्रतिनिधी । सावदा कोवीड रूग्णालयाने काही रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी तीन रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. तीनही रूग्ण चिनावल येथील आहे. या वृत्ताला तालुका वैद्यकिय अधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.

उदळी खूर्द येथील संशयित रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह
कोरोनाने रावेर तालुक्यात थैमान घातले आहे. सावदा कोवीड सेंटरने संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. संशयितांचा तपासणी अहवाल आज आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून चिनावल येथील तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. चिनावल येथे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता १३ वर पोहचली आहे. दरम्यान येथूनच उदळी खूर्द गावातील संशयित रूग्ण जळगावच्या गोदावरी रूग्णालयात उपचार घेत असतांना त्याचेही स्वॅब घेण्यात आले असता ते पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या सात दिवसांपासून ते गोदावरी वैद्यकिय महाविद्यालयात उपचार घेत होते. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले आहे.

Protected Content