जिल्ह्यात १३५ नवीन कोरोना पॉझिटीव्ह; चोपडा व जळगाव शहरात वाढले रूग्ण !

जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव जिल्ह्यात आज नवीन १३५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रूग्णाची संख्या २०२० इतकी झाली आहे. यात चोपडा, जळगाव शहर, अमळनेर, पारोळा तालुक्यात रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २१, भुसावळ ११, अमळनेर १६, चोपडा २३, पाचोरा ३, भडगाव १, धरणगाव ८, यावल ६, एरंडोल ८, जामनेर १२, जळगाव ग्रामीण ५, रावेर ८, पारोळा १३, चाळीसगाव ०, मुक्ताईनगर ०, बोदवड ०, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या २०२० इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

आजच्या रिपोर्टमधून जिल्ह्यातील जळगाव शहर आणि जळगावच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. आज आलेल्या रिपोर्टनंतर जिल्ह्यात आजवरील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही २०२० इतकी झालेली आहे. यामध्ये सर्वाधीक रूग्ण संख्या जळगाव तालुक्यात (शहर ३६७ + ग्रामीण ६८) ४३५ इतकी आहे. याच्या खालोखाल भुसावळ तालुक्यातील रूग्णांची संख्या ३३८ इतकी झालेली आहे. यानंतर अमळनेर-२५२; चोपडा-१६४; रावेर-१५०; भडगाव-९६; यावल-१०६; धरणगाव-९९; जामनेर-९९; पाचोरा-४९; एरंडोल-६४; पारोळा-११४; चाळीसगाव-१९; मुक्ताईनगर-१५ व बोदवड- १४; व इतर जिल्ह्यातील ६ रूग्णांचा समावेश आहे.

Protected Content