राष्ट्रवादी अर्बन सेलने सुचविल्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच्या उपाययोजना

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना तिसऱ्या स्टेजला पोहोचण्याची भीती निर्माण झालेली असून आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे त्याबाबत राष्ट्रवादी अर्बन सेल मार्फत विविध उपाययोजना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मेलद्वारे विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी विनोद देशमुख , समन्वयक मुविकोराज कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात चिकन मटन बंद, , कोणा सोबत फ़िरणे बंद, गरम पाणी सर्व गरजेसाठी वापरणे, ब्रेड पाव बेकरी सामान बंद, बाहेरील व्यक्ती घरामध्ये कोणत्याही कामांसाठी घेवु नये आदी उपाय सुचविण्यात आले आहेत. तसेच ज्या नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर जावे लागतंय त्यांनी गर्दीच्या वेळा टाळून बाहेर जाणे, ट्रेन बस ने ई-पास काढल्याशिवाय प्रवास करणे बंधनकारक. ज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे त्यांनी सुट्टी घेऊन टाकावी. गणपती, दसरा, ईद, दिवाळी, सर्व सण महिना वगैरे नंतर साजरे करावेत अशी सूचना केली आहे. निवेदनांवर जुबेर खाटीक,प्रवीण पाटील, युगल जैन, रुपेश ठाकूर,मिलिंद सोनवणे आदींच्या स्वाक्षरी आहे.

Protected Content