साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जंतनाशक गोळ्यांचे वाटप

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी प्राथमिक केन्द्राअंतर्गत येणाऱ्या मनवेल येथे आरोग्य विभागाच्यावतीने २१  सप्टेंबरपासून जंतनाशक मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत बालके व पौगंडावस्थेतील मुलांच्या आरोग्य संरक्षणासाठी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार विविध आजारांचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षातून दोन जंतनाशक मोहिमा घेतल्या जातात. त्यानुसार उद्या या मोहिमेची अंमलबजावणी शाळा व समुदाय स्तरावर होणार आहे. कोविड-१९ मार्गदर्शक सूचना अवलंबून मोहीम राबविण्यात येणार आहे. एक ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे असा मोहिमेचा उद्देश आहे. २१ सप्टेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिन आहे. २९ सप्टेंबरला मॉप अप दिन असून, शाळाबाह्य किंवा घरी असलेल्या मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहे. एका वर्षाखालील बालकांना जंतनाशक गोळी देऊ नये. १ ते २ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्बेन्डाझोलची अर्धी (२०० मि.ग्रॅ.) गोळी, दोन ते तीन वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्बेन्डाझॉलची एक (४०० मि.ग्रॅ.) गोळी, ३ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्बेन्डाझॉलची एक ४०० मि.ग्रॅ. गोळी देण्याची आरोग्य विभागाची सूचना देण्यात आल्या आहे. यावेळी डॉ.  स्वाती कवडीवाले, आरोग्य सेवक संदिप पाटील, विजय चोपडे ,गटप्रवर्तक चित्रा जावळे आशा स्वंयमसेविका उपस्थित होत्या.

 

Protected Content