अडावद येथे शिवसेनेतर्फे ग्रामपंचायतीस कॉम्प्रेसर मशीन भेट

अडावद, ता.चोपडा, प्रतिनिधी | येथील युवा सेना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करण्यासाठी उपयोगी पडणारे कॉम्प्रेसर मशीन ग्रामपंचायतीस आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते भेट दिले.

शुक्रवार २९ रोजी अडावद ग्रामपंचायत कार्यालयात सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत युवासेना व शिवसेनेच्या मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचा हस्ते लोकनियुक्त सरपंच भावना पंढरीनाथ माळी व ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे यांचेकडे निर्जंतुकीकरणासाठी उपयोगात येणारे कॉम्प्रेसर मशीन देण्याचे आले. संकटाच्या वेळी गावाच्या उपयोगी पडणारे साहित्य देऊन शिवसैनिकांनी आदर्श उपक्रम राबविला म्हणून त्यांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे समाजातील दातृत्व भावना उदयास येऊन कठीण प्रसंगास हातभार लावणारे उपक्रम राबविण्याची प्रेरणा या कृतीतून इतरांना मिळेल असे प्रतिपादन आमदार लताताई सोनवणे यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या भारती सचिन महाजन, सविता रामकृष्ण महाजन, अलताफखा पठाण, मु. ना. पाटील पतसंस्थेचे चेअरमन गुलाबराव पाटील, वडगावचे सरपंच नामदेव पाटील, मंगल इंगळे, महेश गायकवाड, कोमल खांबायत, सचिन महाजन, वासुदेव महाजन, रामकृष्ण महाजन, कालू मिस्तरी, जुनेद खान, अनिल देशमुख, रफीयोद्दीन शेख, जितेंद्रकुमार शिंपी, पी. आर. माळी, ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे, वरिष्ठ लिपिक आनंदा महाजन, लिपिक प्रेमराज पवार आदी उपस्थित होते.

Protected Content