कोरोनामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांचे महाक्रीडाधिवेशन स्थगीत

खामगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ व समन्वय समितीच्यावतीने श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे शारीरिक शिक्षकांचे २ रे राज्यस्तरीय महाक्रीडा अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे कोणासही धोखा होऊ नये म्हणून अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

शासनाने कोरोनाबाबत सावध पवित्रा घेत सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केले आहेत त्यामुळे अमरावती येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत होणारे शारीरिक शिक्षकांचे २ रे महाक्रीडा अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा शाखाध्यक्ष तेजराव डहाके, सचिव एस. एम. चव्हाण यांनी दिली आहे. कोरोनामुळे कोणासही धोखा होऊ नये म्हणून अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशन संदर्भात राज्य समन्वय समितीची बैठक दि. १४मार्च रोजी अमरावती येथे पार पडली. यात अधिवेशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्या आल्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेस महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अरुणराव खोडस्कर, राज्य सचिव डॉ. पुरुषोत्तम उपर्वट, क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, विश्वनाथ पाटोळे, ज्ञानेश काळे, शिवदत्त ढवळे, अविनाश साळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आहे. तरी बुलडाणा जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांनी नोंद घ्यावी, असे बुलडाणा जिल्हा शाखाध्यक्ष तेजराव डहाके यांनी कळविले आहे.

Protected Content