संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

चोपडा प्रतिनिधी । संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती व पुण्यतिथीचे औचित्य साधत दि. ८ ते २४ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संताजी जगनाडे समस्त तेली समाजाच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ८ ते २४ या कालावधीत रोज रात्री आठ ते दहा कीर्तन महोत्सव व दि.९ ते २२ डिसेंबर या कालावधीत रोज सकाळी नऊ ते अकरा वाजता हरिभक्त परायण रवींद्र जी महाराज यांच्यासमवेत व त्यांच्या अमृतमय वाणी द्वारा ज्ञानेश्वरी पारायण व रोज दुपारी २ ते ५ ज्ञानेश्वरी भाव दर्शन निरूपण सोहळा संपन्न होणार आहे. दि.८ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात व सकाळी दहा वाजता संताजी जगनाडे महाराज मंदिर, श्रीराम नगर येथे प्रतिमेचे पूजन होणार आहे व सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२२ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,

दि.२३ डिसेंबर रोजी रोजी सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण व निरूपण समारोप, दहा वाजता गुणी विद्यार्थी व गुणी जणांना पुरस्कार वितरण व गौरव समारंभ, सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन सुभद्रा चौधरी यांनी आपल्या भगिनी कैलास वासी कमल चौधरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ करण्यात आली, सायंकाळी पाच वाजता ग्रंथ दिंडी व श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी उपस्थिती राहून लाभ घेण्याचे आवाहन महेंद्र चौधरी यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे, रोज सकाळी पाच ते सहा या वेळेत काकड आरती व सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी व सर्व सदस्यांनी केले आहे.

Protected Content