Home आरोग्य यावलचा डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह; आधी मुलगाही आहे बाधीत !

यावलचा डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह; आधी मुलगाही आहे बाधीत !

0
75

यावल प्रतिनिधी । शहरातील सुदर्शन टॉकीज परिसरात दवाखाना असणार्‍या डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून याआधी त्यांचा मुलगा देखील कोरोना बाधीत होता होता. हा परिसर आधीच कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी शहरातील सुदर्शन टॉकीज परिसरातील एक २० वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आज त्याचेच वडील कोरोना बाधीत असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, आज पॉझिटीव्ह आढळून आलेल्या ५५ वर्षाचा व्यक्ती हा वैद्यकीय व्यावसायिक असून त्यांचा सुदर्शन टॉकीज परिसरात दवाखाना आहे. या डॉक्टरांचे वास्तव्य हे भुसावळ येथे असले तरी ते जास्तीत जास्त वेळ यावल येथेच व्यतीत करत होते. यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांचे नमूने घेतले जाणार असल्याची माहिती देखील डॉ. हेमंत बर्‍हाटे यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound