अहमदाबादमधील सरकारी रुग्णालय एखाद्या अंधार कोठडीसारखं ; हायकोर्टाने गुजरात सरकारवर ओढले ताशेरे

अहमदाबाद (वृत्तसंस्था) अहमदाबादमधील सरकारी रुग्णालय एखाद्या अंधार कोठडीसारखं आहे. त्यापेक्षाही भयानक स्थिती आहे,अशा शब्दात गुजरात उच्च न्यायालयाने रुपाणी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

 

राज्यातील करोना नियंत्रणाबरोबर रुग्णांना उपचार मिळण्याविषयी गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकावर न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि इलेश व्होरा यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने गुजरातमधील कोरोना परिस्थितीची तुलना थेट बुडणाऱ्या टायनिक जहाजाशी केली. उच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, आजच्या घडीला सरकारी रुग्णालयातील परिस्थिती खूप दयनीय आहे. ही गोष्ट अत्यंत वेदनादायी आणि त्रासदायक आहे. सरकारी रुग्णालय म्हणजे रुग्णांवर उपचार करणे, असे काही दिवसांपूर्वी न्यायालयाने म्हटले होते. पण, आज असे दिसतेय की सरकारी रुग्णालय अंधारकोठडीसारखंच आहे. कदाचित अंधारकोठडीपेक्षाही वाईट, अशा शब्दात न्यायालयाने गुजरात सरकारबाबत नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने कोरोना नियंत्रणासाठी आणि रुग्णालयातील उपचारात सुधारणा करण्यासंदर्भात राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.

Protected Content