Home Uncategorized ‘त्या’ पोलिसाच्या संपर्कातील डॉक्टरासह चौघे क्वारंटाईन

‘त्या’ पोलिसाच्या संपर्कातील डॉक्टरासह चौघे क्वारंटाईन

0
43

चाळीसगाव, प्रतिनिधी । काल धुळे येथुन आलेल्या अहवालामध्ये १२ निगेटिव्ह व १ चाळीसगाव ग्रामीण पोलिस कोरोना बाधित आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील एक महिला, २ पुरुष व त्यांच्यावर उपचार करणारे खासगी डॉक्टर व कंपाउंडर यांना कोविड सेंटर येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील चेकपोस्टवर ड्युटी करित असतांना एक पोलीस पॉझिटिव्ह आलेत. या पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील कळमडू येथील एक महिला व एक पुरुष तसेच पोलिस बांधव राहत असलेल्या भडगाव रोड टाकळी प्र.चा.भागातील एक व्यक्ती व सदरिल पोलिस कर्मचारी ज्या डॉक्टरांकडे गेले होते ते डॉक्टर व कंपाऊडर अशा ५ संशयितांना कोविड सेंटर येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब जळगाव येथे तपासणीस पाठवण्यात आले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यास पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवण्यात आले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी,अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडु नये,असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. बापुसाहेब बाविस्कर व तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound