घरात मृतदेह तीन दिवस पडून; पिंटू कोठारींनी निभावला माणूसकीचा धर्म ! (व्हिडिओ)

 

भुसावळ, प्रतिनिधी । कोरोनाच्या संकटात रोज नवीन-नवीन विषयांना सामोरे जावे लागत आहे. ब्रदी प्लॉट भागातील राजेश वसंत शिवडेकर यांचे निधन झाल्याने व त्यांच्या घरातून शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी निर्मल कोठारीना बोलविले.व शेजार धर्म निभवून आपल्या परिवाराचे सदस्य म्हणून अग्निडाग दिला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंधरा दिवसापूर्वी राजेश वसंत शिवडेकर वय ५० राहणार ब्रदी प्लॉट भागातील असून ते आजारी होते. नेहमी ते टेंशनमध्ये असायचे. निर्मल कोठारी यांनी त्याना सिदम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले होते. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर ते घराबाहेर दोन दिवस दिसले नाही. आजरोजी शेजाऱ्यांना अचानक त्यांच्या घरातून दुर्गंध आल्याने त्यांनी निर्मल कोठारी यांना बोलविले व घर उघडले असता त्यांचे निधन झालेले होते. त्यांचा मृतदेह ही कुजलेला होता.ते घरात एकटे राहत होते. त्यांच्या बहिणीला नाशिकला फोन लावून घटनेची माहिती दिली असता ती येणाच्या परिस्थिती नव्हती. भुसावळच्या वैद्यकीय अधिकारी कीर्ती फलटनकर यांना त्यांच्या आजाराच्या जुन्या फाईल दाखविल्या व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांना सविस्तर माहिती दिली. शेवटी शेजार धर्म म्हणून निर्मल कोठारी व त्यांचे सहकारी मुन्ना अग्रवाल, गोलू कोल्हे शववाहिनीचे ड्रायव्हर बाबू भाई व सर्वात महत्वाची भूमिका बजाविणारे नदीवरील अरुण अशांनी मिळून अंतविधी पार पाडून अग्निदाग दिला. शेवटी कोरोना लोकांना अजून काय पाहायला लावणार लोकांची सध्याची परिस्थिती फार वाईट झालेली आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/678181256299180

 

Protected Content