Home Cities जळगाव वरणगावच्या नागेश्वर मंदिरात पार पडला छोटेखानी लग्नसोहळा..!

वरणगावच्या नागेश्वर मंदिरात पार पडला छोटेखानी लग्नसोहळा..!

0
61

 

जळगाव, प्रतिनिधी। बदलापूर येथील रमाकांत बन्सी नारखेडे (राजोरेकर ) यांची सुकन्या चि.सौ.कां. धनश्री हिचा विवाह सुरेश ज्ञानदेव सरोदे ( पिंपळगाव ह. मु. वरणगाव ) यांचा मुलगा चि. निखिल यांच्याशी अत्यंत साध्या पद्धतीने नागेश्वर मंदिर , वरणगाव येथे पार पडला.

देशभरात असलेल्या कोविड 19 चे संकट लक्षात घेऊन हा विवाह सोहळा मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत नागेश्वर मंदिरात झाला. याप्रसंगी सोशल डिस्टन्सिंग या नियमाचे पालन तसेच सर्वांनी सॅनिटायझर, मास्कचा वापर केलेला दिसून आला. उपस्थितांनी वधु-वरास आशीर्वाद व शुभेच्छा दिल्यात. चि.सौ.कां. धनश्री ही उल्हासनगर येथील व्यावसायिक धनंजय राणे यांची मावस बहीण आहे .रमाकांत व सौ. आशा नारखेडे हे शिक्षक आहेत. लेवा पाटीदार समाजात विवाह सोहळ्यानिमित्ताने लाखो रुपयांचा खर्च होत असतो. त्यात काही अनाठायी खर्चही होतो. मात्र, आम्ही यावर पायबंद घातला आणि नवा पायंडा पडला असे श्री.नारखेडे यांनी सांगितले. समाजातील इतरांनीही सकारात्मक दृष्ट्या विचार केल्यास असा पायंडा पाळल्यास दोन्हीकडच्या पक्षांना त्याचा फायदाच आहे , असेही ते म्हणाले. अनेकांनी नारखेडे व सरोदे कुटुंबियांचे कौतुक केले आहे.


Protected Content

Play sound