आरोग्य पथकातर्फे सांगवी गावातील व्यावसायिक व ग्रामस्थांची तपासणी

यावल, प्रतिनिधी । संपुर्ण जगालाच नाहीतर आपल्या देशात देखील थैमान घालणाऱ्या अत्यंत घातक अशा कोरोना विषाणूंशी लढा देण्यासाठी आपण लॉक डाऊनच्या चौथ्या भागात दाखल झाले असुन या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सांगवी खुर्द ग्रामपंचायतच्या माध्यमातुन दि. १२ मेपासून सांगवी खुर्द येथील आरोग्य तपासणी मोहीमेस सुरुवात करण्यात आली आहे.

गावातील किराणा दुकानदार, दुध विक्रेता व सार्वजनिक ठीकाणी सक्रीय असणाऱ्या ग्रामस्थांची आरोग्य यंत्रणेच्या वतीने कोरोना संसर्गजन्य आजाराचे प्रादुर्भावचा धोका टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणुन थरमोमीटर,आँक्सीमीटरने आरोग्य तपासणी करून त्यांना मास्क वाटप करण्यात आलेत. यावेळी यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी संपुर्ण सांगवी गावात फिरून ग्रामस्थामंध्ये आपल्या आरोग्य विषयी सर्तक व जागृत राहण्याचे आवाहन केले . यावेळी आरोग्य सेवक व आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना पीपीई किट ,मास्क, साँनिटाझर, हेड फेअरिंग, ग्लोज व इतर आरोग्य तपासणी साहित्य देण्यात आले. याप्रसंगी सरपंच विकास पाटील, उपसरपंच निलमताई कोळी, सांगवी ग्रामपंचायत सदस्य डी. के. पाटील ,आशा पाटील, संगिता कोळी, कल्पनाबाई धनगर, ग्रामसेवक आर. पी. तायडे, रोजगार सेवक गणेश कोळी, ग्रामस्थ महेंद्र कोळी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content