चाळीसगावला कापूस खरेदी केंद्राला लवकर सुरू करण्याची प्रतिक्षा

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव येथे कापूस खरेदी केंद्राला मंजूरी मिळाली असतांना अद्यापपर्यंत प्रत्यक्ष खरेदी करण्यास सुरूवात न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

गेल्या आठवड्यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुरावा करून शेकऱ्यांसाठी कापूस खरेदी केंद्रास मंजूरी मिळविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी अद्याप या कापूस खरेदी केंद्रात प्रत्यक्ष कापूस खरेदी सुरुवात न झाल्याने तसेच बाजार समितीमध्ये कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्याकरिता दिलेले. ऑनलाईन फोन नंबर सतत व्यस्त येत असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला असून कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी केंद्र यांचे हेलपाटे मारीत आहेत. बाजार समितीमध्ये ५ फोन नंबर आज कापूस नोंदणीसाठी देण्यात आले असले तरी हे नंबर व यावरील कर्मचारी सतत व्यस्त असल्याचे दिसून येते. दिवसभर या नंबरवर नोंदणीसाठी फोन येत असल्याने सर्वच शेतकऱ्यांचे फोन लागू शकत नाहीत म्हणून ज्या शेतकऱ्यांचे फोन लागत नाहीत त्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत बाजार समितीने अधिक नंबर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Protected Content