जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज रात्री प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये पाचोरा येथील तीन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यामुळे येथील कोरोनाचा संसर्ग कोरोनाचा संसर्ग चिंताजनक पातळीवर पोहचल्याचे दिसून आले आहे.
आज रात्री जिल्हा माहिती कार्यालयाने एक प्रेस नोट जारी करून कोरोना बाधितांबाबत माहिती दिली आहे. यानुसार- पाचोरा व भडगाव येथे स्वॅब घेण्यात आलेल्या 91 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 88 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर तीन व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या तीनही व्यक्ती पाचोरा येथील आहे. यामध्ये 1 वर्षीय मुलगा, 36 वर्षीय पुरूष तर 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे. निगेटिव्ह आढळलेल्या सर्व व्यक्ती या पाचोरा आणि भडगाव येथील आहेत. यात प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचाही समावेश आहे. आज आढळून आलेले रूग्ण हे शिवकॉलनी, माहिजी नाका परिसर आणि दत्त कॉलनी भागातील असून हा परिसर आता सीलबंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 163 झाली आहे. यापैकी 20 रूग्णाचा मृत्यू झाला आहे तर तीन व्यक्ती बरे झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, आज पुन्हा तीन रूग्ण आढळून आल्याने पाचोरा तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या १८ इतकी झाली आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी शहरात उद्या म्हणजे १० मे पासून पुढील सात दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. शहरवासियांनी याचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००