आडगावात दोन कुटुंबातील हाणामारीत महिलेचा मृत्यू

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव येथे दोन कुटुंबात पूर्व वैमनस्यातून झालेल्या हाणामारीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील आडगाव येथे दोन कुटुंबात पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारीत मंगलाबाई युवराज न्हावी (वय ४८ ) या महिलेला जोरदार मार लागल्याने यावल येथे उपचारार्थ आणत असताना उपचारापुर्वीच तिचा मृत्यु झाला. सायंकाळी आडगाव येथील दोन कुटूबात किरकोळ कारणावरून वाद होवून हाणामारी झाली यात मंगलाबाई यांना जोरदार मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस निरिक्षक अरूण धनवडे व सहकार्‍यांनी पोलीसांनी तातडीने आडगाव येथे घटनास्थळी जावून संशयीत आरोपींना ताब्यात घेतले असुन त्यात संयशीत आरोपी म्हणुन दगडू खंडू कोळी, विनोद दगडू कोळी, सागर दगडू कोळी या संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद मयत महिलेचा मुलगा यांनी दिल्यावरून येथील पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content