जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन काळात जमावबंदीचे नियम धाब्यावर ठेवून शहरात बिनधास्तपणे तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्या दहा जणांवर कारवाई करत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सध्या कोरोनाने जिल्ह्यात मोठा कहर माजविला आहे. जिल्हा प्रशासन नागरीकांना घरी बसून राहण्याचे आवाहन करत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊनच्या काळात शहरात विनाकारण फिरणारे व मास्क न लावणे, दुचाकीवर उाबलसीट जाणे अशांवर दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहे. एमआयडीसी परिसरात लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे दहा जणांवर कारवाई केली आहे.
या दहा जणांवर कारवाई
फिरोजखान सलिम खान (वय-३८) रा. शनिपेठ, प्रविण रघुनाथ पाटील (वय-२७) रा. अहुजा नगर, श्रीकृष्ण जगन्नाथ सुडोकार (वय-२८) रा. शिरसोली, यशवंत आनंदा पाटील (वय-५८) रा. नेहरू नगर, अमोल नारायण मराठे (वय-३०), माधव नारायण मराठे (वय-१९) दोन्ही रा. इच्छादेवी नगर, विक्की रविंद्र पारधे (वय-३०) रा. डीमार्ट समोर, सतिश सोमनाथ जोशी (वय-३०) रा. शिवबा नगर, आरीफ हारून शेख (वय-३०) रा. पिंप्राळा हुडको आणि रतिलाल सुकदेव महाजन (वय-५०) रा. रायसोनी नगर यांचा समावेश आहे.