अयोध्यानगरात बंद घर फोडून ५७ हजाराचा मुद्देमाल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अयोध्यानगरात बंद फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील ५७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती प्रमाणे कल्पेश संतोष पाटील (वय-२४) रा. अयोध्या नगर हे आई व वडील संतोष नारायण पाटील व पत्नी यांच्यासह राहतात. कल्पेश पाटील आणि संतोष पाटील हे खासगी नोकरी करतात. १ फेब्रुवारी रोजी सकाळी दोघे कामाला निघुन गेले. कल्पेश यांच्या आई कामानिमित्त गावात गेल्या होत्या. त्यांना सायंकाळी ५.३० ते ५.५५ वाजेदरम्यान घेण्यासाठी कल्पेश पाटील यांच्या पत्नी घर बंद करून गेल्या होत्या. सासू व सून घरी आल्यावर पाहिले असता घरातील अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याच उघडकीला आले. घरात कपाटात ठेवलेले ३७ हजार ५०० रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत, १५ हजार रूपये किंमतीचे मनी मंगळसुत्र, ५ हजार रूपये किंमतीचे चांदीचे भार असा एकुण ५७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. तसेच कपाटातील सामान अस्तव्यस्त करण्यात आले होते. कल्पेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहे. 

Protected Content