कल्पीता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पाचोऱ्यात एकदिवसीय बंद

पाचोरा प्रतिनिधी । ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पीता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाचोरा नगरपरिषद अधिकाऱ्यांचा एकदिवसीय बंद ठेवण्यात आला आहे.

ठाणे (मुंबई) महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्ता कल्पीता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असतांना एका भाजी विक्रेत्याने त्यांच्यावर हल्ला केला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली व त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हल्ला संतापजनक असुन यामुळे शासकिय काम करतांना संपुर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खचते. त्यामुळे अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई व्हावी व या घटनेचा निषेध म्हणुन आज दि.३१ रोजी पाचोरा नगरपरीषद जि. जळगाव संपूर्ण कामकाज पाणीपुरवठा व अग्निशमन सेवा वगळता कडकडीत रित्या बंद ठेवण्यात आले.  

यावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, कर निरीक्षक साईदास जाधव, लेखापाल दत्तात्रय जाधव, अभियंता मधुकर सुर्यवंशी, हिमांशू जैस्वाल, नगर रचनाकार मानसी भदाणे, सहनगर रचनाकार हेमंत क्षिरसागर, लेखापरिक्षक नितीन लोखंडे, संगणक अभियंता मंगेश माने, राजेंद्र शिंपी, शाम ढवळे, प्रकाश गोसावी, ललित सोनार, प्रकाश पवार, विलास देवकर, भागवत पाटील, प्रशांत कंडारे, महेंद्र गायकवाड, प्रगती खडसे, रुमा खेडकर, अमोल अहिरे, राकेश मिश्रा, किशोर मराठे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

नागरीकांना जाहिर आवाहन 

पाचोरा नगरपरीषद हद्दीतील तमाम लोकांना सुचित करण्यात येते की, सद्यास्थितीत सुरु असलेल्या व हवामान खात्याच्या अंदाजानूसार पावसाचा जोर वाढणार असून संभाव्य जोरदार संततधार पर्जन्यवृष्टीमुळे शहरातुन वाहणा-या हिवरा नदीस आणि नाल्यांना पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे शहरातील जुन्या जिर्ण, पडाऊ झालेल्या ईमारती,  घरे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी नदी, नाल्यांच्या पात्रामध्ये तसेच किनारालगत पत्र्याचे शेड, झोपडया, कच्चे तसेच पक्के बांधकाम  करुन अतिक्रमण करुन राहण्या-या नागरीकांना याव्दारे सुचित करण्यात येते की, हिवरा नदीवरील धरण हे पुर्ण क्षमतेचे भरुन ओसंडुन वाहन आहे. हे लक्षात घेता नदी नाल्यांना पुर येण्याची शक्यता असल्याने आपण २४ तासांचे आंत नदी, नाला पात्रातील व किनारालगतचे पुरपातळी कक्षेच्या आतील भागाचे आपले अतिक्रमण काढुन घेवुन गुरे, ढोरे, जनावरे, नागरीक यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे व सतर्क रहावे.

वैयक्तीक आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेची पूर्णत: जबाबदारी आपली स्वत:ची आहे याची नोंद घ्यावी. नदिपात्र आणि पडाऊ घरांपासुन सुरक्षित स्थळी स्थलांतर करुन नगरपरीषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन लोकनियुक्त नगरराध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचेकडून करण्यात आले आहे.

Protected Content