जळगावात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील भुसावळ रोडवर दुचाकी लांबविणार्‍या अल्पवयीन मुलासह चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने  अटक केली आहे.

सागर विलास सपकाळे वय १९ रा. आसोदा रोड, तानाजी मालुसरे नगर, जळगाव असे अटकेतील संशयिताचे नाव असून त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.  याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील योगेश्‍वर नगर येथील मुरलीधर पाटील यांची १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी भुसावळ रोडवरील जानवी हॉटेलसमोरुन दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुचाकी चोरणार्‍या संशयिताबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहूल पाटील यांच्या पथकाने संशयितांबाबत माहिती काढली. व बुधवारी अल्पवयीन मुलासह संशयित सागर सपकाळे यास पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Protected Content