सुप्रीम कॉलनीतील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; सहा जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनीत जुगार अड्डयावर एमआयडीसी पोलीसांनी धाड टाकून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, शहरातील सुप्रिम कॉलनी परीसरातील जय भवानी किराणा समोर करण सुदर्शन मनोहर यांच्या घराच्या बाजुला काही जण इन्नामन्ना पत्त्यांचा खेळ खेळत असल्याची माहिती शुक्रवारी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पोलीसांनी करवाई करत संशयित आरोपी करण सुदर्शन मनोहर (वय-२२), प्रताप रामधन बरडे (वय-३१), करतार सरीचंद पवार (वय-२२), गजानन रोहिदास जाधव (वय-२२), निलेश कैलास पाटील (वय-२१) आणि ज्ञानेश्वर गुलाब बंजारा (वय ३०) सर्व रा. जय भवानी किराणा समोर, सुप्रिम कॉलनी यांना ताब्यात घेतले. यावेळी झन्नामन्ना खेळ खेळण्याचे साहित्य व एकुण ३ हजार १४० रूपयांची रोकड हस्तगत केली.

यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, मुकेश पाटील, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ.सतिष गर्जे यांनी कारवाई केली. सतिष गर्जे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content