विनयभंग करणार्‍या मॅनेजरला सक्तमजुरी

जळगाव प्रतिनिधी । नोकरीसाठी मुलाखतीत आलेल्या दोन तरूणींचा विनयभंग करणार्‍या आतीष कोलारकर या मॅनेजरला एक वर्षाची सक्तमजुरी आणि ४५०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, आतिष अशोकराव कोलारकर (वय ३४, रा. इंदिरानगर, नाशिक) हा एमआयडीसीतील रेनॉल्ट या कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी जळगाव व पारोळा येथील दोन तरुणींनी ४ नोव्हेंबर २०१४ रोजी इंटरव्ह्यू दिला होता. या दोन्ही तरूणींना त्याने आपल्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्याचे सांगितले. यावेळी संबंधित तरुणीने तेथून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिचा विनयभंग केला होता. या दोन्ही तरूणींनी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली विसपुते यांच्या मदतीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक आर. टी. धारबळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केले. न्यायाधीश एम. वाय. नेमाडे यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज झाले. खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने कोलारकर याला दोषी धरून शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. रंजना पाटील यांनी काम पाहिले.

Protected Content