पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार- पुरूषोत्तम कडलक (व्हिडीओ)

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रातिनिध । जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट व मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीसाठी सोशल मीडिया आघाडी मजबूत करतांनाच पक्ष ‘वन बुथ-टेन युथ’ पॅटर्न राबविणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांनी केले.

 

 

आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांच्या उपस्थितीत  बुधवारी २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, रिकू चौधरी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पुरूषोत्तम कडलक म्हणाले की, राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना फोडण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे. त्या अनुषंगाने जिल्हानिहाय बैठका घेण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी जिल्हाध्यक्ष रवींद्रनाना पाटील आणि शहराध्यक्ष रिंकू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. त्यामुळे युवकांच्या माध्यमातून एक वेगळी फळी, एक वेगळ्या पद्धतीने राजकारणाचा ट्रेंड आला आहे. तो बदलवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने संघटना बांधण्याचं काम आम्ही आहोत.

तर त्यांना नारळ दिले जाईल 

तालुकास्तरीय आढावा बैठक घेवून गण व गट निहाय युवकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जिल्हा पदाधिकारी हे तालुक्यावरती जाऊन तालुकाध्यक्षचा आढावा घेतील तालुका अध्यक्ष हा गट आणि गणावरती जाऊन तिथला आढावा घेईल आणि प्रत्येक गावामध्ये  ‘वन बुथ-टेन युथ’ संकल्पना राबविण्यात येणार आहे.  तसेच चांगले सुशिक्षित सोशल मीडियामध्ये एक्सपर्ट असलेली टीम पक्षामध्ये समावून  घेतली. जाईल स्मार्टवर्क करण्यासाठी जे कार्यकर्ते तयार असतील त्यांना पक्षांमध्ये पदाधिकारी म्हणून ठेवलं जाईल. गाढव काम करणाऱ्यांना नारळ देण्यात येणार असल्याचे देखील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांनी सांगितले.

 

Protected Content