औरंगाबादमध्ये ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या ३७३ वर


औरंगाबाद (वृत्तसंस्था)
औरंगाबादमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या एका ९५ वर्षीय वृद्धेचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या १२वर गेली आहे, तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७३ झाली आहे.

 

 

या महिलेला २७ तारखेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेला उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा तीव्र त्रास होता. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील हा पहिला मृत्यू असल्याची आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात गुरुवारी सकाळी आणखी १७ नवीन रुग्ण वाढले. यामध्ये जयभीम नगर २, किलेआर्क २, पुंडलिक नगर ५, हक टॉवर ५, कटकट गेट ३ या रुग्णांचा समावेश आहे. काल शहरातील ३४ व ग्रामीण भागातील एक असे ३५ काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. एकूण बाधितांचा आकडा ३७३ झाला आहे.

Protected Content