ट्रकने तेरा वाहनांना उडविले ; एकाचा मृत्यू

 

पुणे : वृत्तसंस्था । कात्रज बाह्य वळण मार्गावर बाबाजी पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकचा टायर फुटून भीषण अपघात झाला ट्रकने तेरा वाहनांना पाठीमागून उडविले त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भरधाव ट्रक कात्रजकडून नवले ब्रीजकडे निघाला होता. पेट्रोल पंपाच्या उतारावर ट्रकचा पुढील टायर फुटला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला सिंहगड पोलिस व वाहतूक विभागाने घटनास्थळी धाव घेतली अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. क्रेसच्या सहाय्याने वाहने बाजूला काढून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Protected Content