Home आरोग्य फैजपूर येथे मास्कचा वापर अनिवार्य; अन्यथा ५०० रूपयाचा दंड – प्रांत डॉ....

फैजपूर येथे मास्कचा वापर अनिवार्य; अन्यथा ५०० रूपयाचा दंड – प्रांत डॉ. थोरबोले यांचे आदेश


फैजपूर प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे, तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने चेहऱ्यावर मास्कचा वापर न करणाऱ्यांना आता तात्काळ ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे, असे आदेश प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी काढले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन जनजागृती करत आहे. मात्र मास्कचा वापर न करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये ५०० रुपये दंड आकारून सदर निधी मुख्यमंत्री सहायता निधीत वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे यावल- रावेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने आता मास्क बांधणे अनिवार्य झाले आहे. घराबाहेर पडताना आधी तोंडाला चांगल्या प्रतीचे किंवा घरी बनवलेले धुण्यायोग्य मास्क, पांढराशुभ्र रुमाल प्रत्येकाने बांधावा व कोरोनापासून आपले संरक्षण करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी केले आहे.


Protected Content

Play sound