मुंबई प्रतिनिधी । अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असणाया केसरी या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून याला सोशल मीडियात जोरदार प्रतिसाद लाभला आहे.
सरगर्ही येथील गाजलेल्या लढाईवर आधारित केसरी या चित्रपटाबाबत आधीच प्रचंड उत्सुकता लागली आहे. यात फक्त २१ शीख सैनिकांनी जवळपास दहा हजार अफगाणी सैन्याचा केलेला प्रतिकार हा इतिहासात अजरामर झालेला आहे. केसरी चित्रपट याच लढाईवर आधारित असून यामध्ये अक्षयने हवलदार अनुराग सिंग यांची भूमिका केली आहे. यामध्ये परिणिती चोप्राचीही भूमिका आहे. २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शीत होत असून आज याचा ऑफिशियल ट्रेलर लाँच करण्यात आला.
पहा– केसरीचा ट्रेलर.