धक्कादायक : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या !

मुंबई (वृत्तसंस्था) एमएस धोनी, छिछोरी आणि अनेक हिंदी चित्रपटात अभिनय केलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आलीय. दरम्यान, या घटनेमुळे बॉलीवूडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

सुशांत सिंह राजपूतने खूप कमी वेळात बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. नुकताच त्याचा छिछोरी चित्रपट खूप प्रसिद्ध झाला होता. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना जयपूरमध्ये झालेल्या मारहाणीनंतर सुशांत सिंह राजपूत याने या भ्याड हल्ल्याचा केवळ निषेधच केला नाही तर भन्साळींच्या समर्थनार्थ सुशांतने चक्क आपल्या ट्वीटर अकाऊंटवरील नावासमोरचे राजपूत हे आडनाव काढून टाकले होते. यासंदर्भात त्याने एक ट्वीटही केले होते. आडनावाचा मोह आपल्याला सुटणार नसेल तर सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. हिम्मत असेल तर आपल्या पहिल्या नावाने स्वत:ची ओळख बनवा,असे सुशांतने म्हटले होते. दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुरुवातीला मालिकांमधून आपल्या सुरूवात करणाऱ्या सुशांतने 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता.

Protected Content