पारोळा प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते मयूर भोई यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजूंना गव्हाचे पीठ व तांदूळ वाटप करण्यात आले.
शहरात एक हात मदतीचा सध्याच्या काळात होत असलेल्या कोरोना वायरसच्या त्रासमुळे संपुर्ण देशात संचारबंदीचे आदेश पारीत करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर २९ रोजी सामाजिक कार्यकर्ता मयुर भोई यांच्या वाढदिवसा निमित्ताने गोरगरीब आणि गरजूंना लोकांना गव्हाचे पीठ, तांदूळ वाटप करण्यात आले. मयूर भाऊ मित्र परिवाराकडून बेरोजगार झालेल्या लोकांची शंभर ते दीडशे गरजू लोकांना घरी जाऊन अगोदर कार्यकर्त्यांनी नाव नोंदणी करून घेतली व गव्हाचे पीठ तांदूळ वाटप करण्यात आली. यावेळी भूषण टिपरे, योगेश चौधरी, मयुर भोई, रोहित परदेशी, अश्विन चौधरी, कोमल पाटील व मयूर भोईर मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.